लेखिका : फ्रॅंन्चेस्का मेलंन्ड्री
द गार्डीयन, २७ मार्च, २०२० १३:३६ GMT
अनुवाद: शीतल पवार
इटली चे इंग्लंड ला पत्र: आम्हाला तुमच्या भविष्याबाबत जे काय माहित आहे ..."
रोम येथील लेखिका फ्रॅंन्चेस्का मेलंन्ड्री आपल्या लॉकडाऊन दरम्यानच्या काळातील अनुभवांच्या आधारे इंग्लंडच्या व एकूणच सर्व लोकांनी लॉकडाऊन व उठल्यानंतर काय अपेक्षा करायला हव्यात याबद्दल सांगते
प्रसिद्ध इटालियन कादंबरीकार फ्रॅंन्चेस्का मेलंन्ड्री Covid-19 च्या उद्रेकामुळे आपल्या इटलीतील रोम या शहरात मागील जवळ जवळ तीन आठवड्यांपासून बंदिस्त आहे. ती आपल्या यूरोपीय मित्रांना "तुमच्या भविष्यातून" या पत्रात येणाऱ्या काही आठवड्यांत लोक ज्या विविध भावावस्थांमधून जातील त्याबद्दल लिहिते.
मी तुम्हाला इटली येथून लिहीत आहे. याचाच अर्थ मी तुम्हाला तुमच्या भविष्यातून लिहीत आहे. आम्ही आता जिथे आहोत तिथे तुम्ही काही दिवसांतच पोहोचाल. Covid-19 या रोगाच्या साथीचा आलेख आपण सर्वांना एकाच वेळी गिळंकृत करत आहे. काळाचा विचार करता आम्ही काही पायऱ्याच तुमच्या पुढे आहोत, जसे वूहान शहर काही आठवडे आमच्या पुुढे होते. आम्ही जसे वागत होतो, तसे तुम्ही वागताना आम्ही पाहत आहोत. "हा फक्त फ्लू आहे, तेव्हा अनावश्यक गोंधळ कश्याला?" असे म्हनणाऱ्या लोकांपासून ते नेमके परीस्थितीचे गांभीर्य समजले आहे अश्या लोकांपर्यंत, आम्ही अलीकडील काळापर्यंत जी विधाने करायचो तशीच विधाने तुम्हाला करताना पाहत आहोत.
आम्ही तुम्हाला इथून, तुमच्या भविष्यातून पाहत आहोत कि तुमच्यापैकी काही जणांना ऑरवेल, हॉब्झ यांनी म्हटल्याप्रमाणे स्वतःच्या बंद घरातच राहायला सांगितले आहे. पण लवकरच तुम्ही त्यातही खूप गुंतून जाल.
सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही जेवन कराल. ते फक्त सर्वात शेवटच्या गोष्टींपैकी एक गोष्ट, जी तुम्ही अजूनही करू शकता, यासाठी म्हणून करणार नाही.
तुमचा रिकामा वेळ अधिक फलदायी मार्गाने कसा घालवता येईल याविषयी शिकवण्या देणारे डझनभर सोशल नेटवर्किंग ग्रुप्स तुम्ही पाहाल. तुम्ही त्या सर्वांना जॉईन व्हाल आणि काही दिवसांनंतर त्या सर्वांकडे पूर्णतः दुर्लक्ष्य कराल.
तुम्ही संहार आणि जगाचा विनाशा बद्दलच साहित्य पुस्तकांच्या कपटातून बाहेर काढाल. पण लगेचच त्यातील एकही पुस्तक खरोखर वाचाव, असं तुम्हाला वाटत नाही, हे तुमच्या लक्षात येईल.
तूम्ही आणखी एकदा जेवण कराल. तुम्ही नीट झोपू शकणार नाही. लोकशाहीला काय होत आहे? अस तुम्हीच तुम्हाला विचाराल.
तुमचं ऑनालाईन सामाजिक जीवन विनाअडथळा चालू असेल. मेसेंजर, व्हाट्सअप, स्काईप, झूम यांवरती ...
तुम्ही याआधी कधी नाही इतके तुमच्या मोठ्या मुलांची काळजी कराल. भविष्यात आता पुन्हा त्यांना कधी पाहाल याची काहीच कल्पना नाही, या जाणिवेने तुम्हाला छातीवर जोरदार बुक्की मारल्यागत धक्का बसेल.
जुनी भांडणे आणि दुष्मनी तुम्हाला अनावश्यक वाटतील. पुन्हा कधीच आयुष्यात बोलायचे नाही अशी यांच्याविरुद्ध शप्पथ घेतली त्या लोकांना तुम्ही बोलाल, आणि विचाराल "कसे चालले आहे तुमचे?" कित्येक स्त्रियांना घरामध्ये मार खावा लागेल.
जे घरामध्ये थांबू शकत नाहीत कारण त्यांना घरे नाहीत, त्यांचे काय होत आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्यावर ओस रस्ते पाहताना, विशेषतः तुम्ही स्त्री असाल तर तुम्हाला असुरक्षित वाटेल. तर अश्या पद्धतीने समाज कोसळतो का? असे तुम्ही स्वतःलाच विचाराल. हे खरोखरच खूप वेगाने घडत आहे का? तुम्ही हे असे विचार थांबवाल आणि जेव्हा घरी परताल तेव्हा पुन्हा जेवण कराल.
तुम्ही तुमचे वजन वाढवाल. मग तुम्ही ऑनलाईन फिटनेस ट्रैनिंगचा शोध घ्याल.
तूम्ही हसाल. तुम्ही खूप हसाल. याआधी कधी नाही अश्या फाशीच्या विनोदावरही तुम्ही हसायचा प्रयत्न कराल. एवढेच नव्हे तर काही लोक ज्यांनी प्रत्येक मृत बाब गंभीरपणे घेतली, ते आयुष्य, विश्व आणि या सर्वांचाच विचित्रपणा यांवर चिंतन करतील.
तुम्ही सामाजिक दुरता या नियमाला कायमस्वरूपी बांधील राहत सुपरमार्केटच्या रांगेमध्ये मित्र, प्रियकर/प्रेयसी यांच्याशी थोडावेळसाठी का होईना व्यक्तिगत भेटण्यासाठीच्या वेळा निश्चित कराल.
तूम्हाला गरजेच्या नसणाऱ्या सर्व गोष्टींची तुम्ही मोजदाद कराल.
तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांचे खरे स्वभाव तुम्हाला पूर्ण स्पष्टपणे उघड होतील. काही गोष्टींची तुम्हाला खात्री पटेल तर काही गोष्टींचे आश्चर्य वाटेल.
नेहमी बातम्यांमध्ये असणारे विद्वान अदृश्य होतील.त्यांची मते अचानक अप्रासंगीक वाटतील. त्यातील काहीजण युक्तिवादामध्ये आश्रय घेतील, पण त्या युक्तिवादांमध्ये काडीमात्र सहानुभूती नसेल त्यामुळे लोक या विद्वानांना ऐकायचे सोडून देतील. ज्या लोकांना तुम्ही कमी लेखले होते ते लोक उलट आश्वस्त, उदार, विश्वासार्ह, व्यावहारिक, आणि द्रष्टे वाटतील.
हि सगळी अव्यवस्था म्हणजेच पृथ्वी ग्रहाच्या नूतनीकरनाची जणू संधी, असे काही लोकांचे म्हणणे असेल. हे लोक हा गोंधळ पाहण्यासाठी तुम्हाला बोलवतील व या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा विशाल दृष्टिकोन विकसित करण्यास तुम्हाला मदद करतील. हे लोक तुम्हाला अत्यंत त्रासदायक वाटतील: छानच, निम्म्या झालेल्या CO2 उत्सर्जनामुळे ग्रह आता अधिक चांगला स्वास घेतोय, पण तुम्ही पुढच्या महिन्याचे बिल कसे भरणार?
नवीन जगाचा जन्म पाहणे हि अधिक भव्य कि दुःखदायक बाब आहे यातला फरक तुम्हाला समजणार नाही.
तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या आणि लॉन्स मध्ये संगीत वाजवाल. जेव्हा तुम्ही आम्हाला बाल्कनीमध्ये ऑपेरा गाताना पाहिले, तेव्हा विचार केला, "ओह, ते इटालीअन्स". पण आम्हाला माहीत आहे तुम्हीसुद्धा एकमेकांना मनोबल देेणारी गाणी गालं. आणि जेव्हा तुम्ही खिडक्यांतून "I Will Survive" हे गीत मोठ्याने गाल, तेव्हा आम्ही तुम्हाला पाहून वूहानच्या लोकांप्रमाणेच होकारार्थी डोके हलवू. त्यांनी फेब्रुवारी मध्ये आपल्या खिडक्यांतून गाणी गायिली होती आणि आम्हाला गाताना पाहून माना डोलावल्या होत्या.
लॉकडाऊन संपल्या संपल्या पहिली गोष्ट जी मी करेल ती म्हणजे घटस्फोटासाठी अर्ज, अशी शपथ तुमच्यापैकी अनेकजण झोपण्यापूर्वी घेतील.
खूप मुले गर्भात राहतील.
तूमच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता येईल. ती भयंकर गोंधळ आणि प्रश्न निर्माण करतील.
वृद्ध माणसे दंगेखोर युवकांप्रमाणे तुमच्या आज्ञा पाळणार नाहीत. त्यांना बाहेर जाण्यापासून, लागन होण्यापासून व मृत्यूपासून वाचवण्यासाठी, त्यांचे बाहेर जाणे थांबवण्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी भांडण करावे लागेल.
सर्व मेडिकल वरकर्सच्या पर्यायाप्रमाणे तुम्हालाहि गुलाबांच्या पाकळ्यात झाकून घ्यावे असे वाटेल.
संपूर्ण समाज हा सामूहिक प्रयत्न करण्यासाठी एकवटला आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण एकाच बोटीत आहात, असं तुम्हाला सांगीतलं जाईल. हे खरही असेल. हा अनुभव चांगल्यासाठीच बदलेल, एका संपूर्ण मोठ्या समूहाचा भाग म्हणून तुम्ही स्वतःकडे एक व्यक्ती म्हणून काय पाहता.
वर्ग, खरेतर यामुळेच संपूर्णता भेद होणार आहे. सुंदर गार्डन व घरगुती प्रोजेक्ट्सची गर्दी असणाऱ्या घरात बंद केले गेल्याची स्थिती कायम राहणार नाही. त्याचबरोबर घरातून काम करता येणं शक्य होणं किंवा तुमचं काम नाहीस होतय हे पाहणं हि स्थिती देखील कायम राहणार नाही. ज्या बोटीमध्ये बसून तुम्ही सर्वजण सगळीकडे फैलावलेल्या साथीच्या रोगाला हरवण्यासाठीचा प्रवास करत असाल ती प्रत्येकाला सारखी वाटणार नाही, ना ती सर्वांसाठी सारखी असणार आहे. कारण ती कधीच सर्वांसाठी सारखी नव्हती.
अशी एक वेळ येईल जेव्हा तुमच्या लक्षात येईल हे खरोखरच कठीण आहे. तुम्ही घाबरून जाल. तुम्ही तुमची भीती तुमच्या प्रियजनांजवळ व्यक्त कराल किंवा तुमच्याबरोबर त्यांनाही ओझं द्यायला नको म्हणून स्वतःजवळच ठेवाल.
तुम्ही पुन्हा एकदा जेवण कराल.
आम्ही इटलीमध्ये आहोत. आणि हेच आम्हाला तुमच्या भविष्याबद्दल माहित आहे. पण हे फक्त लहान स्वरूपातील भविष्य सांगणं आहे. आम्ही खरेतर खूप कमी द्रष्टे आहोत.
जर आपण आपली दृष्टी अधिक दूरच्या भविष्यावर वळवली, भविष्य, ज्याबद्दल तुम्ही आणि आम्ही सुद्धा अनभिज्ञ आहोत, त्याबद्दल आम्ही तुम्हाला एवढेच सांगू शकतो: जेव्हा हे सर्व संपलेल असेल, तेव्हा जग पूर्णपणे बदललेलं असेल.
© Francesca Melandri 2020