खोपा
ते तू म्हणतोस 'चल एक खोपा बांधू',
कुठे कसा बांधायचा याचे गाणे घोकताना,
तुला ती फांदी- काड्याहि खुणावतात म्हणे,
पण मला तर भीती वाटते खूप,
'त्या' पक्षाच्या घोळक्यांची,
अन त्यांच्या कर्कश ओरडण्याची,
ते कुणी इथलेत,
तर कोणी लांबच्या प्रदेशातून आलेलेत म्हणे,
ते आहेत तीक्ष्ण नखांचे, धारदार चोचीचे,
ते टोच्या मारून मारून जखमी करतात,
अन घाबरल तर रक्तबंबाळ,
त्यामुळे माझा पुरता गोंधळ उडालाय,
शिवाय त्यांचे या जंगलाचे नियम आहेत म्हणे,
खूप खूप जुने ...
उदा. त्यांनीच मादी निवडून द्यायची,
तिने खोप्याबाहेर पडू नये,
किती अंडी उबवावी,
किती नर उपजावे इ. इ. असे
नाहीतर ते खोपा मोडतात,
मादीला मारून टाकतात,
पिल्लाना बेघर करतात,
अन नराचे तर पंखच छाटतात,
सोबत दुसरा खोपा करण्याची आशाही,
त्याची या झाडावर, त्या उंच आकाशात उडण्याची इच्छाही ...
तरीहि हवाय तुला माझ्यासवे खोपा?
आशयघन!
ReplyDelete