"आलबेल"
: सई परांजपेसई परांजपे यांच 'आलबेल' हे दोन अंकी नाटक आहे. एकूण चार पात्रे असणाऱ्या या नाटकात बाप्पा, सदा व भैरव हे तिघेजण खुनाच्या आरोपामध्ये तुरुंगाच्या कोठडीत बंदिस्त आहेत.
लेखिका म्हणते त्याप्रमा।णे पार्श्वभूमी, भाषा, संस्कार, आचार, विचार, नितीमुल्य या बाबतीत या तिघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. जबरदस्तीने एकमेकांच्या सहवासात आलेल्या या तिघांमध्ये कालांतराने जवळीक होऊ लागते. ते आपसात सुखदुःखाच्या गोष्टी बोलू लागतात. आपण केलेल्या गुन्ह्यांचे तपशील एकमेकांना सांगतात.
त्यांचा एक साधा सामान्य माणूस ते विशिष्ट परिस्थितीत केलेल्या खुणांमुळे/ गुन्ह्यांमुळे कोठडी पर्यंतचा प्रवास ऐकणं खूप रोमहर्षक आहे. हे ऐकल्यावर प्रेक्षकाला फाशीची टांगती तलवार कायम असणाऱ्या या तिघांबद्दल सहानुभूती वाटल्याशिवाय राहत नाही.
तुरुंगाच्या आवारात गार्ड हातातील दंडुका वाजवत 'आलबेल' म्हणजे सगळं काही ठीक अशी आरोळी वेळोवेळी नाटकात देतो यावरून लेखिकेने या नाटकाचे शीर्षक "आलबेल" असे ठेवले आहे.
No comments:
Post a Comment