#Metoo# हे काय ग बाई?
आश्चर्याने म्हणाली,या बघ बातम्या ...
'#me-too# चा पहिला बळी एम. अकबर'
'विशाल समुद्रात गळाला लागलेला एक मोठा मासा'
'हिमनगाचे एक टोक'
वेगैरे वेगैरे ....
मी म्हटले,
अग Me too कुठे नाही?
माझ्या मनात, तुझ्या घरात
गल्लीपासून अवघ्या जगात...
पण काही असो
या me too ने टराटर फाडलेत बुरखे
प्रस्थापित-तथाकथित
विचारवंत, पत्रकार, लेखक
राजकारणि, समाजसुधारक,
योगी अन पुरोगाम्यानंचे
पण..
वाट बघुयात आपण मात्र
सध्या शहरी उच्चभृंत सुरु झालेली ही चळवळ
खेड्यापाड्यातील कष्टकरी बाईलाही आवाज देण्याची,
अन काळजी घेऊयात आपण,
किड्यांसह तांदळालाही न रगडण्याची
सध्या तरी..
तुझे metoo निपचित राहुदेत पडून
बरेच होईल जर मनाच्या तळघरातच गेले सडून
शेवटी किमान ..
एक आशा करूया
इथून पुढे,
अधू-अपंग, दुबळे-मतिमंद,
निष्पाप अबाल, वृद्ध
यांचा बळी न जाण्याची...
#शीतलपवार#
No comments:
Post a Comment