☺ स्माईल सिमी 😃
यशस्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जूनला आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनतर त्याचे फॅन, नातेवाईक, पोलीस, प्रशासन, न्यायव्यवस्था यांच्या आपापसातील संघर्ष व गदारोळात मुख्य मुद्दा, जो आजच्या घडीला अत्यंत महत्वाचा आहे, तो बाजूलाच राहिला आहे.
नेमका तोच विषय घेऊन, जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्त १० ऑक्टोबरला करण थापर प्रोडाक्शन्सची "स्माईल सिमी" नावाची एक फिल्म युट्युबवर आली आहे.
हे २०२० साल आहे, तरीदेखील मानसिक आरोग्याच्या बाबतीत समाज्यात खूप गैरसमज आहेत. आतापर्यंत कधी नाही इतक्या वेगाने नैराश्य मानवी जीवनामध्ये प्रवेश करत आहे. खूप उशीर होण्यापूर्वी एकमेकांना सहकार्य करुया, जाणीव जागृती करुया, आणि इतरांचे जीवन वाचऊया असा संदेश देणारी हि फिल्म आवर्जून पाहण्यासारखी आहे.
सिमीच्या (साधिका सियाल) आयुष्यात चोरपावलांनी येणाऱ्या शत्रूने प्रथम तिच्यासह तिच्या कुटुंबाचा आनंद कसा हिरावून घेतला..त्या राक्षसामुळे सिमीच्या भावना, वर्तन व भोवताल आकलनात कोणते बदल झाले..त्याला इतरांकडून मिळणारा प्रतिसाद..आणि त्याबद्दलच्या अज्ञान-गैरसमजातून एक दिवस अनपेक्षितपणे कुटुंबच कसं उध्वस्त होतं.. शेवटी आशेचा किरण दिसतो काय..या सर्व प्रश्नांची उत्तरे फिल्म पाहताना नक्कीच मिळतात.
जतीन-प्रतीकच्या संगीताच्या साथीने उदित नारायण यांनी गायिलेल्या शीर्षक गीतामुळे प्रेक्षकांना आधीच
पकडून ठेवणारी कथा अधिक रंजक झाली आहे.
कथा आणि संकल्पना मालती राय यांची आहे. तर फिल्मचे संवाद, पटकथालेखन व दिग्दर्शन किरण थापर यांनी केले आहे. मात्र मानसिक आरोग्याच्या संबंधित समस्या असणाऱ्या व्यक्तींनी हि फिल्म एकट्याने पाहू नये, अशी सुचना दिलेली आहे.
No comments:
Post a Comment