Sunday, 17 May 2020

पराग गावकर लिखित "सेक्स मार्केट" : एका पुस्तकाचे हुंदके



           "एका पुस्तकाचे हुंदके"

              पराग गावकर लिखित 'सेक्स मार्केट' (2014), या सत्यघटनेवर आधारित पुस्तकाला डॉ. रुपेश पाटकर यांची आगळीवेगळी प्रस्थावना लाभली आहे. तीत रशियन क्रांतिकारी अलेक्झांद्रा कोलंताय हिची 'सिस्टर्स' हि कथा स्वैरपणे अनुवादली आहे.
               हि कथा या पुस्तकाचा नायक अरुण पांडे याला 1994 मध्ये MSW करताना देशाच्या विविध भागांतील देहविक्रयाच मार्केट अभ्यासात असताना ओळख झालेल्या संघटित गुन्हेगारी विश्वाच प्रातिनिधिक प्रतीक आहे. ती अशी...


                बाळाच्या मृत्यूनंतर नोकरीवरून काढलेली ती नवऱ्यालाही सोडते तेव्हा बेघर व बेकार होण्याची वेळ येते. शेवटीचा आशेचा किरण म्हणून ती लेखिकेच्या दारात याचना करत उभी असते, तेव्हा दोघींच्याही डोळ्यासमोरून तिचा यशस्वी गतकाल सरकतो.
                 इतर बोल्शेविक क्रांतिकारकांप्रमाणेच सर्व प्रकारचे शोषण नाहीसे करून एक न्यायी जग तयार करण्याचं स्वप्न असणाऱ्या त्या दोन सहप्रवाश्यांना वर्षभरानंतर एक कन्यारत्न होत. त्याला बढती व पगार वाढल्यानंतर तीच काम करणं त्याच्या प्रतिष्ठेच्या आड येऊ लागतं शिवाय घरात अधिक लक्ष दिल्यामुळे घर व्यवथीत राहील असही त्याच म्हणणं. दुसरीकढे तिच्या नवऱ्याच्या उत्पन्नाशी तिच्या काम करण्याच्या अधिकाराचा संबंध वरिष्ठांनी कसा लावला हे तिला पटत नसत. तरीही तो एका बिझनेस ट्रीपवरून परतेपर्यन्त सर्व ठीक चालत राहतं.
             तो आता मित्र, बिझनेस पार्टीजमुळे पिऊन येऊ लागलाय व कामामुळे आपल्याकडे लक्ष देत येत नसेल अशी समजूत तिने करून घेतलेली. पन एके दिवशी तो धम्माल करण्यासाठी मैत्रिणीला सरळ घरातच घेऊन आला तेव्हा तिच्या मनाचे तुकडे तुकडे झाले. दुसऱ्या खोलीत ते दोघे खिदळत असताना इकडे ती आजारी  बाळाला रात्रभर मांडीवर घेऊन बसली होती.
              सगळे विसरून त्याला माफ करणाऱ्या तिला तो तुला राहायला चांगले घर-कपडे देतो, कशाला नोकरी? असे भांडत राहतो. शेवटी ती नोकरी आवडते पण अल्पावधीतच बाळही जाते तेव्हा मात्र तो अंत्यविधीलही हजर राहत नाही. अन एके दिवशी पुन्हा तो एका तरुणीला घेऊन घरी आलाय हे यावेळीहि पचवणे तिला शक्य नसते. पण थोड्याच वेळात ती स्त्री हिच्यापुढे येऊन रडू लागते. 'मला वाटले तो एकटा राहतो, नोकरी गेल्याने आईचे आजारपण व चूल पेटवण्यासाठी आपण स्वतःला विकले' असे ती सांगू लागली.
               तो तथाकथित कॉम्रेड असहाय मुलीला मदत करायची सोडून तीच शोषण करत होता याचा तिला भयंकर संताप आला. त्याचवेळी नवऱ्याच्या मिळकतीमुळे आपण वाचलोय याची जाणीव झाली. तिने शेवटच्या पगाराचे सर्व शिल्लक पैसे त्या मुलीला दिले एक बहीण म्हणून. त्या रात्री तिचे त्याच्यावरचे प्रेम कायमचे मेले, जणू नव्हतेच कधी, ना कसली वेदना, तिने त्याला कायमचे पुसून टाकले.
                आज त्या दोघी सारख्याच होत्या, बेकार आणि बेघर. त्या मुलीला पुन्हा पैश्याची गरज होती म्हणून हि शेवटची आशा म्हणून लेखिकेच्या दारात उभी होती.
       इथे कथा संपते. पण अलेक्झांद्रा कोलंताय ने उभा केलेला देहविक्रयाचा प्रश्न सर्वांना अंतर्मुख करणारा आहे.
                या पुस्तकाच्या पुढील भागात अरुण पांडे यांनी 1997 ते 2004 या काळात गोव्यातील बायना या भागात देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या वेदना अन या धंद्यावर जगणाऱ्या पोलीस, राजकारणी व इतर तमाम घटकांशी भिडतानाचा संघर्ष टिपला आहे. अन जून 2004 च्या मध्यरात्री अचानक सरकारी ऑर्डर काढत ती अख्खी वस्ती उद्धस्त करीत सर्वांना विस्थापित करतानाचा अनुभवहि सांगितला आहे. 2013 मध्ये गोवा खंडपीठाने यांचं पुनर्वसन करण्याबाबत दिलेल्या निर्णयाची प्रक्रिया अद्याप पुढे सरकलेला नाही. मात्र अरुण पांडे 'अर्ज' या संस्थेच्या माध्यमातुन या स्त्रियांच पुनर्वसन करत आहेत.
            शेवटी या शोषणाच्या बदलनाऱ्या स्वरूपाबद्दल ते काळजी व्यक्त करतात. ते सांगतात अलीकडे सोफिस्टीकेटेड होत असलेला देहविक्रय तथाकथित सभ्य वस्तीतल्या बंगल्यात, पंचतारांकित हॉटेल, मसाज पार्लर, इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली होणाऱ्या कॉन्फरन्समध्ये, एखादी व्हॅन, इंटरनेट-मोबाइलवर दाखवल्या जाणाऱ्या एखाद्या एस्कॉर्ट गर्ल्सच्या जाहिरातीच्या माध्यमातून चालतो. तेव्हा देहविक्रय करणाऱ्या या स्त्रियांच्या वेदना मिटवण्याचं काम आणखी आव्हानात्मक बनत आहे.
               
                                          #शीतलपवार#

No comments:

Post a Comment