ज्या झाडांच्या सहवासात
नसत मुळीच प्रेम,
संवेदनशीलता अन सहभावना,
संवाद अन आपलेपणा
विश्वास अन भविष्य इ...
उन्मळून पडतात ही झाडे सहज,
विजांच्या कडकडाटांनी अन,
वादळ वाऱ्यांच्या माऱ्याने...
घट्टमुळे रोवली नसलेल्या
परिस्थितीची अपरिहार्यता पाहत
त्यांना पडू..झडू..द्यावे वाळत...
सरपण मोडून वाहतांना भेलकांडत
ओरखडले खोलवर तरीही
जाळावीत लाकडे ढलप्यांंसह चुलीत...
मग उंच उडणाऱ्या राख...धुरांतून
द्यावी नवसंजीवनी पुन्हा परत !!
- शीतल पवार
No comments:
Post a Comment