गौर रंगाची कुरळ कुंतला
दु;खित सुंदर मधुबाला
अमावसेपासून स्मृतीने
झुरली पौर्णिमा प्रीतीने
चांदणी देई निरोप तिजला
'हात मागतो चंदू तुजला'
लाजलाजली पौर्णिमा राणी
साक्ष पटेना श्रवणाला
'चंदू मागतो हात मजला?
एकामागून गे एक दिवस
समारंभाची घोडदौड बस!
भुरभूर भव काळ लोटला
लग्न ठेपले आड दिसाला
पहाटवारा झुळझुळ वाही
मंजुळ कोकीळ ओवी गाई
कावळा ढोलक बॅंडवाला
लावन्यवीर मोर स्वागताला
पोपट, हंस, मैना, बदक
बहारीले भव संगीत
रंगीत जरीचे तोरण विशाल
नारळ, फुले, पतकी-माल
गगनमंडपी रंग उधळला
सप्तभूवन नाचू लागला
शुभस्थानी अफाट गगनी
मंगलसमयी स्वर्गही आला
स्वर्गाहून मोहक तेज तयाला
चांद्कुरवल्या मार थाटात
जमल्या मंडपी पटापट
लाल, तांबडे , निळे प्रणांगण
त्रिभुवनाला देई आमंत्रण
नवरी सुंदर सुममाला
शृंगार तियेने भव केला
असीम रुपेरी निळी पैठणी
तिजवर टिकल्या चांदणी
दोन्ही करांत चुडा तियेला
धरतीने हिरवा भरला
सोने, चांदी, माणिक, मोती
तेने पैठणी भारीली होती
भट आणावया गे वराला
तत्क्षणी न चंदू आला
प्रथम पाहिला मंडप डोकुनी
आगमन होई मग हळू वाकुनी
बसे टेकून कर क्षितिजाला
भरजरी पोशाख मग ल्याला
तेथून निरखे सारा थाट
स्मितीत होऊन गाली बोट
मग झपझप वरती आला
पोशाख वराचा केला
काय पांघरली जरीची शाल
स्तिमित होऊन देखे नारीनर
कुठे वाजती सनई चौघडा
वरातसमयी दिव्य घोडा
रंगबिरंगी सुमने-हार
करांत धरुनी पुढ्यांत वर
मंद छनकती पौर्णिमा बाल
काय पांघरली जरीची शाल
परस्परांना हार घातला
विरहाचा भव काळ लोटला
कर पसरुनी दोन्ही बाला
देई आलिंगन वराला
तव पूर हर्षाचा आला
वर घेऊन गे राणीला
: शीतल पवार